Ad will apear here
Next
मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज
वेगवेगळे खाण्याची हौस केवळ मोठ्यांना असते, तशी मुलांनाही असते. मुलांच्या वाढत्या वयात त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला देताना त्यातून त्यांना उरेल अशी ऊर्जा मिळेल आणि एकूणच आरोग्यासाठी ते पोषक असेल, याकडे लक्ष द्यायला हवे. कांचन बापट यांनी या पुस्तकात मुलांना आवडतील अशा पौष्टिक पदार्थांच्या पाककृती सांगितल्या आहेत. तयार पोळीपासूनही विविध पदार्थ बनवता येतात, हे या पुस्तकातून समजते.

अप्पे, इडली, डोसे, उत्तप्पा, पराठे, पोहे, ब्रेड, भात यांपासून करता येणारे कितीतरी पदार्थ पुस्तकात दिले आहेत. कटलेटचे प्रकार, रोल्स, रॅप, फ्रीटर्स, भजी, पकोडे, धिरड्याचे प्रकार, केकचे विविध प्रकार पुस्तकात समाविष्ट आहेत. नेहमीच्या ढोकळयासह अन्य प्रकार, टिकाऊ पदार्थ यांसह लाल भोपळ्याचे पदार्थ, तसेच मक्याच्या पदार्थांच्या पाककृती पुस्तकात दिल्या आहेत.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १७४  
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZYFBQ
Similar Posts
मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज पारंपरिक पदार्थांबरोबरच चुरचुरीत सिझलर्स, पिझ्झा, पास्ता एवढेच नव्हे, तर वॉफल्स, पुडिंग्स, मफिन्स घरच्या घरी बनवता आले तर किती बहार येईल. कांचन बापट यांनी या पुस्तकात हे पदार्थ घरच्या घरी करण्यासाठी पाककृती दिल्या आहेत.
१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज् + १०१ बेबी फूड रेसिपीज् रोज उठून ब्रेकफास्टला काय करायचे, हा कोणत्याही घरात पडणारा प्रश्न. कांचन बापट यांनी मात्र, आपली या प्रश्नातून सोडवणूक केली आहे. वर्षभर पुरतील अशा ब्रेकफास्टच्या पाककृती त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत.
संपूर्ण शाकाहारी सुरुची आयुष्यभराचा सोबती असे या पुस्तकाचे वर्णन करायला हरकत नाही. कारण इंदिरा परचुरे यांनी १४०० हून अधिक पारंपरिक व आधुनिक पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
मुलांच्या आरोग्यासाठी २०२ पौष्टिक एग रेसिपीज ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’, असे म्हणतात ते खरेच आहे. कारण अंड्यातून मिळणारे घटक शरीरासाठी अत्यावश्यक असतात. अंड्यातील प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन डीसारखे घटक कायम ठेवून त्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थही बनवता येतात. कांचन बापट यांनी या पुस्तकात अंड्याच्या तब्बल २०२ पाककृती दिल्या आहेत. ‘ब्रेकफास्ट’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language